शैक्षणिक

टेक्निकल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमास सुरुवात

अभ्यासक्रमास 1 जुलै 2025 पासून सुरुवात झालेली आहे.

टेक्निकल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमास सुरुवात

अभ्यासक्रमास 1 जुलै 2025 पासून सुरुवात झालेली आहे.

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम यांना अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामती या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमास 1 जुलै 2025 पासून सुरुवात झालेली आहे.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी साहेब, माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय श्री पवार बी एन साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये या वर्षीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम ऐच्छिक स्वरूपात सुरू करण्यात आलेला आहे.

यासाठी इयत्ता पाचवी व सहावी चा एक गट इयत्ता सातवी व आठवी चा एक गट, नववी व दहावीचा गट व अकरावी- बारावीचा गट असे गट तयार करण्यात आलेले असून त्यांना प्रात्यक्षिक सहित हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे यांनी या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा भविष्याच्या दृष्टीने फायदा करून घेण्याचे आवाहन केले .

तसेच बदलत्या युगात या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल याविषयीचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री पाचपुते सर पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर तसेच या अभ्यासक्रमाचे विद्यालयातील प्रमुख श्री विकास जाधव उपस्थित होते.हा अभ्यासक्रम श्री विकास जाधव, श्री अरविंद मोहिते,श्री प्रवीण राठोड,सौ. लगड, व्ही .ए .सौ. भोंग,एन. व्ही सौ.देवकर पी. पी शिकवणार आहेत.

Related Articles

Back to top button