
टेक्निकल मध्ये महिला दीन उत्साहात साजरा
एक नाटिका सादर
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील, सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे,सौ.जयश्री हिवरकर,अर्चना पेटकर,सुजाता गाडेकर व सर्व महिला शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इ ७ वी ब व क च्या विद्यार्थांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक नाटिका सादर केली.तसेच काही विद्यार्थांनी आपले मनोगते सादर केली.यावेळी अरविंद मोहिते व नीलेश गायकवाड यांनीही आपली मनोगते व्यक्त करत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कल्याण देवडे यांनी महिलांचे योगदान स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रिया भोंग यांनी केले तर आभार स्मिता निंबाळकर यांनी मांडले.