टेक्निकल मध्ये विविध गुण दर्शन कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांनी ही मोठ्या उत्साहात या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला.

टेक्निकल मध्ये विविध गुण दर्शन कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांनी ही मोठ्या उत्साहात या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात विविध गुण दर्शन कार्यक्रम संपन्न झाला.विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यावेळी प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व रायत्मऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कल्याण देवडे,श्री आनंदराव करे,श्री हरिश्चंद्र यादव,ज्येष्ठ शिक्षक प्रदीप पळसे,जयश्री हिवरकर,अर्चना पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.यामध्ये कोळी नृत्य,वारकरी नृत्य,देशभक्तीपर गीत,मराठी लावणी,सोलो नृत्य,गणेश वंदना,खंडोबा नृत्य,गोंधळ नृत्य अश्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश होता.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर विद्यार्थ्यांनी ही मोठ्या उत्साहात या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.स्मिता निंबाळकर यांनी तर आभार प्रदीप पळसे यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रूपणवर,सौ.भोंग व श्रीमती गाडेकर यांनी केले.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती सुजाता गाडेकर व सर्व सांस्कृतिक विभागातील सदस्य यांनी केले.