टेक्निकल मध्ये 33 वर्ष शिपाई म्हणून सेवा केलेल्या श्री संपत भिसे यांना लिपिक पदी पदोन्नती
११५ सेवकांना मुलाखत घेऊन लिपिक पदावर सोयीने बढती देण्यात आली आहे.

टेक्निकल मध्ये 33 वर्ष शिपाई म्हणून सेवा केलेल्या श्री संपत भिसे यांना लिपिक पदी पदोन्नती
११५ सेवकांना मुलाखत घेऊन लिपिक पदावर सोयीने बढती देण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल विद्यालय व जुनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या श्री संपत रघुनाथ भिसे यांना 33 वर्षानंतर लिपिक पदी पदोन्नती मिळालेली आहे. 1992 मध्ये प्रथम रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात शिपाई या पदावरती त्यांची नेमणूक झाली होती.
गेले 33 वर्ष झालं ते अत्यंत प्रामाणिकपणे शिपाई म्हणून या विद्यालयात कार्यरत होते आणि त्यांना आता बारामतीच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये पदोन्नती मिळून कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असणार आहेत.
रयत शिक्षण संस्थेतील ११५ सेवकांना लिपीक पदी बढती दिली आहे.
रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिकपणे व इमानदारीने काम केलेल्या व बढतीसाठी होकार कळवलेले ११५ सेवकांना मुलाखत घेऊन लिपिक पदावर सोयीने बढती देण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेत सेवक शालेय स्वच्छता, शालेय सुरक्षा, पत्रव्यवहार, दैनदिन शालेय कामकाजात मदत करत असतात.
बढती मिळालेल्या लिपिक सेवकांना पगार बिले, सेवापुस्तके, शाखा जमाखर्च याचा हिशोब व इतर कामे पार पाडावी लागणार आहेत.
बढती मिळालेल्या लिपिक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून ते संस्था प्रशासनाचे आभार मानत आहेत.या निमित्ताने श्री संपत भिसे यांचा सत्कार प्राचार्य कल्याण देवडे,मुख्य लिपिक श्री गुरगुळे सर,श्री किरण हिंगसे व सर्व सेवकांच्या हस्ते करण्यात आला.त्यांच्या या पदोन्नती बाबत स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सदाशिव (बापू)सातव यांनी अभिनंदन केले.