टेक्निकल विद्यालयात एन. एम.एम. एस परीक्षा सुरळीत संपन्न
423 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात एन एम एम एस परीक्षा सुरळीत संपन्न झाली.महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इ.8 वी च्या आर्थिक द्रुबल घटकातील विद्यार्थांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.
या वर्षी या केंद्रावर 430 विद्यार्थी परीक्षेसाठी होते त्यापैकी केवळ 7 विद्यार्थी गैरहजर होते.बारामती तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी या परीक्षेसाठी होते.
आज 423 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.इयत्ता 8 वी एन एम एम एस परीक्षा,डिसेंबर 2024 च्या निमित्ताने आज आर एन आगरवाल टेक्निकल हायस्कूल,बारामती,केंद्र क्रमांक 2104 ला मा.श्री निलेश गवळी साहेब (गटशिक्षणाधिकारी) व श्री नवनाथ कुचेकर साहेब (विस्तार अधिकारी) बारामती पंचायत समिती,बारामती यांनी भेट दिली यांच्यासोबत केंद्र संचालक विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे साहेब,परीक्षा विभाग प्रमुख श्री सोमनाथ मिड, श्री निलेश गायकवाड, श्री लालासाहेब आडके,श्री विकास जाधव उपस्थित होते.