टेक्निकल विद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे होते.
टेक्निकल विद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे होते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय बारामती या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची 195 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्त्री-शिक्षणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून श्री विकास जाधव सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.त्यांनी दिलेल्या समतेच्या संदेशाची माहिती सरांनी दिली. त्याचप्रमाणे आदित्य सपकाळ व जोया मुलाणी यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे केली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे होते.प्रसंगी पर्यवेक्षक श्री रमेश जाधव,अर्जुन मलगुंडे,महादेव शेलार,सोमनाथ मिंड, मोहन ओमासे,सुनील चांदगुडे,सौ.जयश्री हिवरकर व इतर शिक्षक बंधू उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वराली पवार हिने तर आभार कु.सृष्टी बर्गे हिने मांडले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री प्रदीप पळसे यांनी केले होते.