टेक्निकल विद्यालयामार्फत कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्याला 62 हजारांची मदत
उपचारासाठी भरती हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट

टेक्निकल विद्यालयामार्फत कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्याला 62 हजारांची मदत
उपचारासाठी भरती हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयामार्फत कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या मार्फत 62 हजार रुपयांची मदत केली आहे.
या विद्यालयात इ 5 वी इ च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सार्थक अमोल अडसूळ याला अचानक रक्ताचा कॅन्सर असल्याचे निदान झाले.त्याच्या पालकांनी त्याला उपचारासाठी भरती हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट केले.
परंतु त्याचे वडील मजुरी करत असल्याने त्यांना सदर उपचारासाठी जो खर्च येत होता तो करण्यास अडचण येऊ लागली.इ5 वी इ चे वर्गशिक्षक श्री भालके सर यांनी याची माहिती विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे यांना दिली.विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या विद्यार्थ्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थांनी व शिक्षकांनी मिळून 62 हजार रुपयांची मदत त्या विद्यार्थांचे पालक श्री विशाल अंबादास अडसूळ यांच्याकडे सपूर्द केली.सर्व विद्यार्थांचे व शिक्षकांचे आभार पालकांनी मांडले.शाळेच्या या कामाचे कौतुक समाजातील विविध स्तरातून होत आहे.