टेफला ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा थिंक सीएसआर युवा २०२० सबलीकरण पुरस्कार अंकिता पाटील यांना प्रदान
युवक वर्गासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची घेतली दखल
टेफला ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा थिंक सीएसआर युवा २०२० सबलीकरण पुरस्कार अंकिता पाटील यांना प्रदान
युवक वर्गासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची घेतली दखल
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा च्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील यांना टेफला ग्रुपचा वतीने ‘थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार 2020″ राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अंकिता पाटील यांच्या पायाला दोन दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतरच त्या या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहिल्या.
‘थिंक फाउंडेशन ‘ हा टेफला ग्रुपचा एक सामाजिक उपक्रम आहे. सामाजिक विकास, कॉर्पोरेट गव्हर्नन्स या संबंधी उपक्रमांना समर्थन देणे तसेच कला, साहित्य, संस्कृती आणि शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे कार्य टेफला ग्रुप थिंक फाउंडेशनच्या माध्यमातून करतो.
अंकिता या युवकांना व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत तसेच विविध माध्यमातून युवकांची प्रगती कशाप्रकारे होईल यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. अंकिता पाटील यांनी कोविडच्या काळामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी व युवकांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची दखल घेत अंकिता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रसंगी अंकिता पाटील म्हणाल्या,
मला या वर्षीचा थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल टेफला फाउंडेशन ग्रुपचे व थिंक फाउंडेशनचे खूप खूप आभार. आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. समाजासाठी विशेषता युवकांसाठी आपण काहीतरी करावे या उद्देशातून मी कार्य करत आहे या पुरस्काराने मला पुढील कार्य करण्यास अजून प्रोत्साहन मिळाले आहे व एक नवीन ऊर्जा प्राप्त झाले आहे.
या पुरस्कार वितरण समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.