आपला जिल्हा

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील

गॅस टंचाईमुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील

गॅस टंचाईमुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर

बारामती वार्तापत्र

उद्योगजकांच्या मागणीचा विचार करता टोरेंट गॅस कंपनीने औद्योगिक क्षेत्राचा सर्व्हे करून पाईपलाईनद्वारे उद्योजकांना विनाअडथळा गॅस पुरवठा करावा, कोणतीही दिरंगाई न करता माफक दराने गॅसचा पुरवठा सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिले.

अमेरिका, इस्राईल आणि इराण मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी बारामती कार्यालयात उद्योजकांना भेडसावणाऱ्या गॅस व इतर समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार,बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, टोरेंट गॅस कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, अमेरिका, इस्राईल व इराण यांच्यामध्ये सुरु युद्धामुळे उद्योगांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या घटकांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उद्योगावर विपरीत परिणाम होवून उत्पादनास अडथळा निर्माण होत आहे .यामध्ये मुख्यत्वे गॅस टंचाईमुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले, या बाबीचा विचार करता गॅस कंपनीने उद्योजकांना सुरळीत गॅसचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे श्री. पाटील म्हणाले.

या बैठकीत उद्योग प्रभावित क्षेत्र, कच्च्या मालाचा तुटवडा, उत्पादन खर्च वाढ, निर्यातीवर होणारे परिणाम, आयात समस्या, इंधन, गॅस पुरवठा, कामगार कपात आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

Back to top button