स्थानिक

ठाण्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद होतं. तिथं पण असंच व्हायला हवं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोमणा

वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण

ठाण्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद होतं. तिथं पण असंच व्हायला हवं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोमणा

वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण

बारामती वार्तापत्र 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अप्रत्यक्ष टोमणा लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार हे काल बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना एक लक्षवेधी प्रसंग घडला.

पाहणीदरम्यान एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधत, “मी ठाण्यावरून इथे आलो आहे. बारामती खूप छान वाटली,” असे सांगितले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “ठाण्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद होतं. तिथं पण असंच व्हायला हवं होतं. सगळीकडे विकास व्हायला हवा.”

अजित पवारांच्या या विधानाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर केलेला अप्रत्यक्ष टोमणा म्हणून पाहिले जात आहे. ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय बालेकिल्ले मानले जाते. त्यामुळे ठाण्याच्या तुलनेत बारामतीतील विकासकामांचा उल्लेख करत अजित पवारांनी सूचक भाष्य केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या वक्तव्यातून अजित पवारांनी राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास व्हावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण आणि सत्ताधारी नेत्यांमधील सूक्ष्म मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, अजित पवारांचा हा टोमणा केवळ सहज केलेली टिप्पणी होती की जाणीवपूर्वक केलेले राजकीय विधान, यावर आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button