डाळींब खोडावरील फुटव्याच्या नियंत्रणास कृषीदूतांचे मार्गदर्शन.
मुळे खोडावरील फुटव्याचे नियंत्रण
डाळींब खोडावरील फुटव्याच्या नियंत्रणास कृषीदूतांचे मार्गदर्शन
मुळे खोडावरील फुटव्याचे नियंत्रण
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी डाळींब बागेत फुटव्या वर नियंत्रण कसे करावे याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
शेतकऱ्यांना डाळींब पिकात अनेक समस्या येतात त्यातील एक म्हणजे खोडा वरील फुटव्याचे नियंत्रण. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ दिसून येते.त्या खर्चा वर मात करण्यास कृषीदुतांनी एक नवीन उपक्रम शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकरित्या करुन दाखवण्यात आला.
त्यात त्यांनी मल्चिंगच्या सहाय्याने डाळींब खोडाला गुंडाळून आणि बुरशी नाशकाचा वापर करून पार पडले. या मुळे खोडावरील फुटव्याचे नियंत्रण होते.
सदर प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
कृषिदूत अथर्व साळुंखे, प्रतिक मोरे, आनंद धर्माळे, प्रतिक सदाफळ,श्रेयस भोसले, रुद्र कुतवळ , अनुराग वळवी, वेंकट वैभव यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.
त्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही. बुरुंगले व विषय मार्गदर्शक जि. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.