स्थानिक

शनिवारपर्यंत मतदार नोंदणीची संधी; नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी.

शनिवारपर्यंत मतदार नोंदणीची संधी; नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी.

पुणे, प्रतिनिधि

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी येत्या शनिवार दि. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्र. 6 भरुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर असून त्यापूर्वी 10 दिवसांपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते.

त्यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. 6 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 19 ऑक्टोबरपूर्वी सादर करावा, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

Back to top button