डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या संशयितास अटकपूर्व जामिनासाठी एक लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश
हायकोर्टानी हल्ल्याप्रकरणी आरोपीवर ओडले ताशेरे
डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या संशयितास अटकपूर्व जामिनासाठी एक लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश
हायकोर्टानी हल्ल्याप्रकरणी आरोपीवर ओडले ताशेरे
बारामती वार्तापत्र
बारामतीतील डॉ. राहुल जाधव यांच्या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजी जाधव या व्यक्तीने त्या ठिकाणी असलेल्या भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ व इतर कर्मचाऱ्यांकडे अश्लील हावभाव करून त्यांना शिवीगाळ केली.या प्रकरणी अडसूळ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शिवाजी जाधव याच्या विरुध्द बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी जाधव याच्या वतीने बारामतीतील जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी शिवाजी जाधव यांनी एक लाख रुपये अगोदर मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावेत असा आदेश देत.कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी कोरोना वॉरीयर्स म्हणून जी निःस्वार्थ सेवा केली आहे, ती न विसरता येण्यासारखी आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले दुर्देवी आहेत, असे मतही मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आहे.