राहाता शहरात डाॅ. पिपाडांची “डॉक्टर आपल्या दारी” मोफत आरोग्य तपासणी
राहाता : भारतीय जैन संघटना, राहाता नगरपरिषद तसेच डॉ.राजेंद्र पिपाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉक्टर आपल्या दारी” मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार हा उपक्रम सुरु केला असुन यावेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा,आरोग्य अधिकारी डॉ.गोकुळ घोगरे,डॉ.राजेंद्र पिपाडा,उपविभागिय पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे व पो.नि.श्री.भोये, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव मुनावत,नगरसेवक भिमराज निकाळे,गणेश निकाळे,भाऊसाहेब आरणे,राहाता नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक श्री.नवनाथ जगताप, डॉ.भिंगारदिवे,डॉ.अशोक लोढा, डॉ.सौरभ लोढा, डॉ.जांगडा, देवेंद्र मुनावत पंकज मुथा,नेमीचंद लोढा,पारस पिपाडा,स्वप्निल लोढा,नरेंद्र पिपाडा,शितल पिपाडा तसेच भारतीय जैन संघटना व जैन युवक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थीत होते.
राहाता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर व आण्णाभाऊ साठे नगर तसेच गौतम नगर या परिसरापासुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोशल डीस्टन्सींगची अंमलबजावणी करुन तपासणी साठी आलेल्या रुग्णांना तपासुन त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान जर कोणी संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ ग्रामिण रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
कोरोना व्हायरसच्या निमित्ताने राहाता शहरात बंदोबस्त करणारे “पोलिस दादा” यांच्याही आरोग्याची तपासणी करण्यात आली यावेळी शिर्डीचे उपविभागिय पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे तसेच राहात्याचे पोलिस निरिक्षक श्री.भोये हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.वाकचौरे म्हणाले की कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बाहेरुन येणा-या नागरीकांची माहिती तात्काळ नगरपरिषद तसेच पोलिस प्रशासनाला द्यावी तसेच त्यांनी भारतीय जैन संघटना तसेच राहाता नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी उपविभागिय पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे,डॉ.राजेंद्र पिपाडा तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवजी मुनावत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
जग भरात कोरोना विषाणुचा प्रादर्भाव वाढत आहे. आपल्या देशातही काही ठिकाणी या विषाणुने रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी भारतीय जैन संघटना तसेच राहाता नगरपरिषद व डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनद्वारे, डॉक्टरांच्या टिम मार्फत रुग्णांची तपासणी करुन त्यांना त्याच ठिकाणी मोफत औषधोपचार देण्यात आले. यावेळी परिसरातील नागरीकांनी देखील सोशल डिस्टंन्सींगची अंमलबजावणी करुन या उपक्रमास सहकार्य केले.
यावेळी राहाता नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी पुर्णवेळ देवुन या उपक्रमात सहभाग नोंदविला.