डॉ. अतुल सरांची द्रोणाचार्य अकॅडमीचे जे ई ई परीक्षेत यश
विद्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष्य दिल्याने १००% रिझल्ट

डॉ. अतुल सरांची द्रोणाचार्य अकॅडमीचे जे ई ई परीक्षेत यश
विद्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष्य दिल्याने १००% रिझल्ट
बारामती वार्तापत्र
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेन – २०२५ चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत डॉ. अतुल गरगडे यांच्या द्रोणाचार्य अकॅडमीने घवघवीत यश मिळवले.
द्रोणाचार्य अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्या मधून गार्गी ढबाळे, आर्यन पाखरे, ओम गायकवाड व यश गुरुसिंधनवार या ४ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा पास करून ते सर्वजण जेईई अँडव्हान्ससाठी पात्र ठरले.
मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, छोटी बॅच बनवून विद्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष्य दिल्याने १००% रिझल्ट मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे . मर्यादित विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर वयक्तिक लक्ष्य देता येते व विद्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष्य दिल्यावर ते हमखास रिझल्ट देतात.
त्यामुळे क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देऊन द्रोणाचार्य अकॅडमी जेईई चे फक्त ४० ॲडमिशन व नीट चे फक्त ४० ॲडमिशन घेऊन याच ८० विद्यार्थ्यांवर मेहनत घेऊन गुणवत्ता व दर्जा च्या आधारे यश मिळाले आहे.
शिक्षणा बरोबर संस्कार व विज्ञाना बरोबर अध्यात्माची विद्यार्थ्यांना कशी गरज आहे ते पटवून दिले. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण – संस्कार – विज्ञान – अध्यात्माची सांगड घालू व भारताला वैदकीय,अभियांत्रिकी क्षेत्रासाठी डॉक्टर, इंजिनिअर देऊ असे अकॅडमीचे संचालक डॉ. अतुल गरगडे यांनी सांगितले.