डॉ. दीपाली एस.चव्हाण (अनपट) यांना पीएच.डी. पदवी प्रदान
८ शोधनिबंध नामवंत जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत

डॉ. दीपाली एस.चव्हाण (अनपट) यांना पीएच.डी. पदवी प्रदान
८ शोधनिबंध नामवंत जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.दीपाली एस. चव्हाण (अनपट), विभागप्रमुख – बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ.चव्हाण (अनपट) गेली १६ वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर ८ शोधनिबंध नामवंत जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत आणि व्यवसाय प्रशासन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांचा पीएच.डी. संशोधन प्रबंध पुणे जिल्ह्यातील कापड उद्योगांमध्ये हरित विपणन प्रथांचा विकास व शाश्वत विकासासाठी प्रभावी साधन म्हणून वापर – एक अभ्यास या विषयावर आधारित होता. त्यांनी हा प्रबंध डॉ. शिल्पा आर.कुलकर्णी, मॅट्रिक्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आंबेगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिवारातर्फे डॉ. दीपाली एस. चव्हाण (अनपट) यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, प्राध्यापक. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.