डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची होणार मदत ! अनेकांनी मांडल्या सूचना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची होणार मदत ! अनेकांनी मांडल्या सूचना
इंदापूर : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची बैठक दि.२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी संपन्न झाली.यावेळी सन २०२१ साठी नूतन सदस्यांच्या कमिटीची निवड सर्वानुमते करण्यात आली.सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजी मखरे हे होते.
यावेळी सन २०१९ सालच्या जयंती महोत्सव कमिटी ने सर्व आर्थिक व्यवहार सर्वांना वाचून दाखवला. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती कशी साजरी करता येईल तसेच समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नयेत त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच शैक्षणिक साहित्यासाठी मदत कशी करता येईल अशा विविध सामाजिक विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली.
तसेच सन २०२१ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यामध्ये अध्यक्षस्थानी सुहास मखरे,उपाध्यक्षपदी दर्याराज मखरे,प्रतीक भोसले,सुशांत ननवरे,खजिनदार पदी पवन मखरे,सह खजिनदार पदी प्रशांत मखरे,सचिव पदी अक्षय मखरे, सहसचिव पदी सिद्धार्थ गाडे, कार्याध्यक्ष पदी उत्तम गायकवाड, सह कार्याध्यक्ष पदी संभाजी मखरे तसेच सल्लागार म्हणून ॲड. राहुल मखरे ,बाळासाहेब मखरे, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे,हनुमंत कांबळे, प्रा.अशोक मखरे,ॲड.किरण लोंढे,दादा साबळे,अविनाश मखरे, आनंद मखरे,ॲड.सुरज मखरे, सुधीर मखरे, बजरंग मखरे यांची निवड करण्यात आली.