स्थानिक

डॉ. विजयकुमार काळे यांना “भारत सन्मान गौरव पुरस्कार 2025” प्रदान

दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

डॉ. विजयकुमार काळे यांना “भारत सन्मान गौरव पुरस्कार 2025” प्रदान

दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

बारामती वार्तापत्र

संमोहन उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामती, व पुणे येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ डॉ. विजयकुमार काळे यांना “भारत सन्मान गौरव पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.
हा प्रतिष्ठित सन्मान शिवराजमुद्रा सम्मेलन – कराड येथे रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. ये कार्यक्रमाचे आयोजन ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सातारा यांच्या वतीने करण्यात आले होते.

या प्रसंगी अभिनेते दिग्दर्शक अनिल गवस, शिवराजमुद्रा सम्मेलन संस्थापक श्री निलभिन्तडे, मनोज शिंदे व विविध सामाजिक संस्था चे संचालक आणि मान्यवर उपस्तीत होते.

डॉ. विजयकुमार काळे यांनी मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, आत्मविश्वास वाढ, नातेसंबंध सुधारणा आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात हजारो लोकांचे जीवन सकारात्मकरीत्या बदलले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना भारत सन्मान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार माझ्या आई वडीलांना, गुरुजनांना आणि माझ्या सर्व रुग्णांना,आणि टीमला समर्पित आहे.

समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा या सन्मानाने दिली असल्याचे डॉ. विजयकुमार काळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

Back to top button