डोर्लेवाडी च्या माजी सैनिकाचा नामदेवराव शिंदे यांनी केला सत्कार
ग्रामस्थांनी आयोजित केला सेवानिवृत्ती निमित्त समारंभ

डोर्लेवाडी च्या माजी सैनिकाचा नामदेवराव शिंदे यांनी केला सत्कार
ग्रामस्थांनी आयोजित केला सेवानिवृत्ती निमित्त समारंभ
बारामती वार्तापत्र
सतरा वर्ष सीमेवर रात्रंदिवस खडा पहारा देत, देशाची सेवा करून डोर्लेवाडी येथील जवान लान्स नायक विजयकुमार काळकुटे हे आज आपल्या गावी परत आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले या सत्कार समारंभास बारामती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे उपस्थित होते.
काळकुटे यांनी नाशिक, ओडिसा ,मुंबई, जम्मू-काश्मीर गुजरात ,उधमपुर ,अंबाला या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले 17 वर्षाच्या अविरात सेवे नंतर सेवा नीवृत्ती समारंभ आज गावात पार पडला.
या निवृती समारंभ कार्यक्रमास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे उपस्थित होते. शुभेच्छा देताना नामदेवराव शिंदे म्हणाले डोर्लेवाडी गाव सन्माननीय गाव आहे. प्रत्येकाचा आदर करणारे गाव आहे .मी खूप भाग्यवान आहे. डोर्लेवाडी गाव माझ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते. पोलीस आणी मिलीटरी मध्ये काम करताना असणारा फरक त्यांनी सांगितला. देशसेवा करुन आलेल्या जवानांचा सत्कार सर्व गावकरी करतात ही खुप अभिमानास्पद गोष्ट आहे.असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.