डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यात्रा रद्द करून मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यात्रा रद्द करून मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
‘याजसाठी केला होता अठ्ठाहास ! शेवटचा दिस गोड व्हावा ! आता निश्चितीने पावलो विसावो! खुंटलीया धावा तृष्णेचिया ! कवतुक वाटे जालीया वेचाचे ! नाम मंगळाचे तेणे गुणें ! तुका म्हणे मुक्ती परीनिली नोवरी!आता दिवस चारी खेळी मेळी ! या अभंगावर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन झाले दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करण्यात आला.
तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन येथील बीज यात्रा रद्द करण्यात आली होती.येथील संत तुकाराम महाराज मंदिरात दरवर्षी बीजे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व यात्रा भरत असते या सोहळ्याला पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातून ५० हजारांहून अधिक भाविक येत असतात.
या वर्षी मात्र कोरोनाचे संकट वाढल्याने मंदिर समिती व ग्रामपंचायत यांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
मंदिरात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सात दिवस पारायण व अखंड वीणा चालू होता. अनेक भाविकांनी घरीच तुकाराम गाथेचे पारायण व उत्सव साजरा केला. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ बीजेनिमित्त यात्रा भरत असते. पै पाहुणे दरवर्षी या यात्रेला येतात.यावर्षी मात्र यात्रा न भरल्यामुळे नागरिकांना हुरहूर लागून राहिली होती.
मंदिर आकर्षक फुलांनी सजविले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मंदिरास भेट दिली. याठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संत तुकाराम महाराज देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.