स्थानिक

तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर बारामतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी

पुणे जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग सर्वात मोठी नगरपरिषद

तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर बारामतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी

पुणे जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग सर्वात मोठी नगरपरिषद

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.आज झालेल्या मुंबई मध्ये झालेल्या सोडतीकडे बारामतीतील इच्छुकांचे लक्ष लागले होते.

तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर बारामती नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने या निवडणूकीबाबत साहजिकच कमालीची उत्सुकता आहे. आपल्याला संधी मिळावी या साठी अनेक इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे, मात्र निवडणूक लढविताना नगराध्यक्षपदाचा स्वतंत्र उमेदवार द्यावा लागणार असल्याने हा चेहरा निवडण्यासाठी राजकीय प्रमुखांना अनेक कसोट्या लावाव्या लागणार हे स्पष्ट आहे.

पुणे जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बारामती नगरपरिषदेकडे पाहिले जाते.नवीन रचनेनुसार सर्वाधिक म्हणजे 41 नगरसेवक बारामतीतून नगरपरिषदेसाठी निवडून जाणार आहेत.नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने या पदावर कोणीही दावा करु शकते.खुल्या प्रवर्गासाठी याचा अर्थ या पदावर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, एनटी, महिला आणि इतर सर्व असे कुणीही या निवडणूकीसाठी नशीब आजमावू शकतात.

यंदा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून द्यायचा असल्याने नगराध्यक्षपदाचा चेहरा देताना सर्वांना मोठी कसरत करावी लागणार आहे.बारामती शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मनापासून काम करणारा,पुरेसा वेळ देणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा देण्याचे आव्हान राजकीय पक्षासमोर असेल.

या पूर्वीचे बारामतीचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी होते.त्यामुळे यंदा आरक्षण पडणार नाही असा अंदाज होता तो खरा ठरला. बारामतीत गेल्या काही वर्षात नगरपरिषदेची इमारत सुसज्ज झाली असून कोटयवधींची विकासकामे पूर्णत्वाला गेलेली असल्याने, शहराच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाची संस्था असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच होणार हे आता स्पष्ट आहे.

Back to top button