तरुणाईला थिरकायला भाग पाडणारे बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड…
दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला.
तरुणाईला थिरकायला भाग पाडणारे बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड…
दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला.
मुंबई :प्रतिनिधी
हिंदी कलाविश्वात डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनात आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.
त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.
बाप्पी लाहिरी यांची गाजलेली बॉलिवूड गाणी
यार बिना चैन कहा रे
याद आ रहा है तेरा प्यार
रात बाकी, बात बाकी
तम्मा तम्मा लोगे
बम्बई से आया मेरा दोस्त
ऊलाला ऊलाला (डर्टी पिक्चर)
तुने मारी एंट्रिया
दोन वर्षांपूर्वी कोरोनावर मात
बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे. 2020 मध्ये एप्रिल महिन्यात बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना सौम्य लक्षणे होती. ब्रिच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती.