राजकीय

तातडीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय; वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुकीला सज्ज!

तातडीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय; वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुकीला सज्ज!

न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी लढणारा आवाज!

बारामती वार्तापत्र

आज बारामती येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार, युवक जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, तालुकाध्यक्ष रामदास जगताप आणि महिला तालुकाध्यक्ष सुरेखा लोंढे उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की —
👉 वंचित बहुजन आघाडी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून इतर समविचारी पक्षांशी युती करण्याचा विचार करेल.
परंतु, जर अशी युती घडून आली नाही, तर 👉 वंचित बहुजन आघाडी स्वबळावर मोठ्या ताकदीने निवडणूक लढवेल.

बैठकीत ठरविण्यात आले की, पक्षाचे प्रामाणिक आणि कार्यक्षम कार्यकर्ते यांना निवडणुकीत अग्रक्रम दिला जाईल. तसेच, बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी जोरदारपणे लढवणार आहे.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, आगामी निवडणुकीसाठी पक्ष एकजुटीने सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे, संघटक साईनाथ लोंढे,वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात,वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुकाध्यक्ष अनुप मोरे, युवा तालुका दौंड विशाल शिंदे, इंदापूर युवा तालुका किर्तीकुमार वाघमारे, माळेगाव शहर अण्णा घोडके, पुण्यशील लोंढे, भारत सोनावणे,सुरज गव्हाळे, संदीप अहिवळे, विनय दामोदरे, उपस्थित होते

न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी लढणारा आवाज!

Back to top button