तालुकास्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी महिंद्र रेडके ; तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सत्कार
विविध समित्यांमध्ये समन्वय साधण्याकरीता झाली निवड

तालुकास्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी महिंद्र रेडके ; तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सत्कार
विविध समित्यांमध्ये समन्वय साधण्याकरीता झाली निवड
इंदापूर : प्रतिनिधी
तालुकास्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महिंद्र रेडके यांचा सत्कार तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि.१५) पंचायत समिती इंदापूर येथे करण्यात आला.
इंदापूर पंचायत समिती,स्वच्छता व पर्यावरण तज्ञ, ग्रामपंचायती तसेच जिल्हा नियोजन समिती व तालुकास्तरीय समित्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी तालुकास्तरीय अध्यक्षपदी महेंद्र रेडके यांची निवड करण्यात आली. त्यामुळे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्या हस्ते व सभापती स्वाती शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिंद्र रेडके यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी बोलताना तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींसाठी महिंद्र रेडके नेहमीच धावून येतात.शासनाने तालुकास्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी अतिशय योग्य अशा माणसाची निवड केली.
यावेळी समितीचे सदस्य काळे,तेजपृथ्वी ग्रुपचे गणेश शिंगाडे,प्रसाद पाध्ये ,दुर्योधन पाटील,हनुमंत यमगर व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.