तालुकास्तरीय सर्व शासकीय समित्यांचे कामकाज सुरू करा ; इंदापूर काँग्रेसची मागणी
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांची घेतली भेट
तालुकास्तरीय सर्व शासकीय समित्यांचे कामकाज सुरू करा ; इंदापूर काँग्रेसची मागणी
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांची घेतली भेट
इंदापूर : प्रतिनिधी
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शासकीय समित्या ह्या तालुका व जिल्हा पातळीवरील खात्यांची कामे सुरळीत व पारदर्शक चालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गठित करण्यात येतात.गेल्यावर्षी विविध खात्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या परंतु संजय गांधी निराधार योजना समिती वगळता अन्य समित्यांचे शासन स्तरावर अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे ते सुरू करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील अनेकांची विविध समित्यांवर नेमणूक करण्यात आली असून संबंधितांना त्याबाबत नेमणूकीची पत्रे शासन स्तरावरून मिळालेली आहेत. मात्र शासनस्तरावर यांचे अद्याप कामकाज सुरू झालेले नाही.यामध्ये संजय गांधी निराधार योजना समिती या केवळ एकमेव समितीचे कामकाज सुरू असून दर महिन्याला याची आढावा बैठक तहसीलदारांच्या उपस्थित होते.लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व सुशासन आणण्यासाठी या समित्यांचे कामकाज सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे लोकांची विविध खात्यातील असणारी कामे मार्गी लागण्यास मदत होईल.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जाकीर काझी, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. संतोष होगले, तालुका सरचिटणीस श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे, प्रदीप शिंदे, चेतन कोरटकर, संतोष आरडे, राहुल वीर, राहुल जाधव,भगवान पासगे, अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड,ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील, तुषार चिंचकर, समीर शेख आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.