तालुका स्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेतजनहितच्या पाच खेळाडूंची बाजी…
पाचही खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश प्राप्त केले.

तालुका स्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेतजनहितच्या पाच खेळाडूंची बाजी…
पाचही खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश प्राप्त केले.
बारामती वार्तापत्र
आंतरशालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धा सोमवार दिनांक १५/०९/२०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत कु. गायत्री कुमार गावडे ४० किलो वजन गट प्रथम क्रमांक, कु. समिधा अविनाश थोरात ३६ किलो वजनी गट प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच कु. स्नेहा महेश रणवरे ७० किलो वजनी गट द्वितीय क्रमांक, चि. स्वानंद मयूर पवार २५ किलो वजनी गट द्वितीय क्रमांक, कु. वैष्णवी शिवाजी माने ५० किलो वजनी गट तृतीय क्रमांक.
या पाचही खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश प्राप्त केले. या खेळाडूंना NIS कोच क्रीडा शिक्षक श्री. सचिन सुभाष नाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.