तालुका स्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेमध्ये सांगवी शाळेचे घवघवीत यश !!
प्रथम सहा क्रमांक प्राप्त करणारी तालुक्यातील एकमेव शाळा

तालुका स्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेमध्ये सांगवी शाळेचे घवघवीत यश !!
प्रथम सहा क्रमांक प्राप्त करणारी तालुक्यातील एकमेव शाळा
बारामती वार्तापत्र
तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा मालेगाव कॉलनी येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी च्या विद्यार्थ्यांनी 21 स्पर्धा प्रकारापैकी 6 स्पर्धा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच 7 स्पर्धामध्ये द्वितीय क्रमांक आणि एका स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवत तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मालेगाव कॉलनी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय कल्याणराव पाचांगणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कुचेकर साहेब, हारे साहेब ,भोसले साहेब, सातपूते मॅडम तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, पंचायत समितीचे सर्व विषय तज्ञ, त्याचबरोबर पर्यवेक्षणासाठी तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढावी त्यांच्यातील श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण या कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी पाठ्यक्रमातील कविता कथा, WH. प्रश्न, नाट्यीकरण ,शब्दसंपत्ती यांचा सराव व्हावा यासाठी कालबद्ध स्पर्धात्मक इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री आयुष प्रसाद साहेब यांच्या प्रेरणेतून व मा.प्राचार्य DIET पुणे मा. सौ. शोभा खंदारे मॅडम तसेच मा. सौ.संध्या गायकवाड मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेला आहे.
🟢सांगवी शाळेने पुढील स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे……
गट 3/4
स्पर्धा प्रकार –
🏵️शब्दसंपत्ती 🏵️
कु. मृगांक्षी अश्विन कांबळे
गट 5/6
स्पर्धा प्रकार –
🏵️ शब्दसंपत्ती 🏵️
चि.पार्थ गणेश जगताप
🏵️ स्पर्धा प्रकार – निबंधलेखन 🏵️
कु. अनुष्का संतोष तावरे.
गट 7/8
स्पर्धा प्रकार – वक्तृत्व स्पर्धा
कु. ईश्वरी बापूराव जाधव
स्पर्धा प्रकार – शब्दसंपत्ती
कु.ईश्वरी बापूराव जाधव.
स्पर्धा प्रकार – कविता गायन
कु. तेजस्विनी सचिन तावरे व इतर
———————————–
🏵️🏵️ द्वितीय क्रमांक🏵️🏵️
गट १/२ री
स्पर्धा प्रकार – कविता गायन
कु. सलोनी गव्हाणे व इतर
गट ५/६ वी
१) स्पर्धा प्रकार – नाट्यीकरण
कुमारी सई तावरे व इतर.
२ ) स्पर्धा प्रकार -कथा सांगणे
कु. शरयू संतोष तावरे
३) स्पर्धा प्रकार – WH.QUESTION
कु.उर्वी सतीश पाटोळे
गट .७/८वी
स्पर्धा प्रकार नाट्यीकरण
कु. देविका प्रवीण सूर्यवंशी व इतर
स्पर्धा प्रकार – निबंध लेखन
कु. तेजस्विनी सचिन तावरे
स्पर्धा प्रकार – WH.QUESTION
कु. तेजस्विनी सचिन तावरे
———————————-
🟢🟢 तृतीय क्रमांक 🟢🟢
स्पर्धा प्रकार – संभाषण चि. हर्षल सुधीर होले व इतर.
गटशिक्षणाधिकारी श्री संजय जाधव व विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांचे शुभहस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांना श्री मारुती जगताप हर्षदा जगताप सौ अश्विनी कुंभार सौ.शांता बालगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षीताई तावरे, सांगवी चे सरपंच श्री चंद्रकांत तावरे व मुख्याध्यापिका सौ.छाया गायकवाड यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.