स्थानिक

तीन वर्षाच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

बऱ्हाणपूर येथील घटना.

तीन वर्षाच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

बऱ्हाणपूर येथील घटना.

बारामती वार्तापत्र

बारामती- खेळता खेळता एका लहान चिमुरड्याचा विहिरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे आज सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अधिराज सागर आहेरकर ( वय.३ ,वर्ष) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे.अधिराजला विहिरीत पडल्यानंतर तात्काळ बाहेर काढण्यात आले. मात्र त्याआधीच तो मृत्यू पावला होता.

मिळालेली माहिती अशी की, अधिराज हा तीन वर्षाचा चिमुरडा घरासमोरील अंगणात खेळत होता. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यग्र होती. अचानक विहिरीत काहीतरी पडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील मंडळी घरा बाहेर आली. त्यावेळी त्यांना अधिराज आजूबाजूला खेळत असताना दिसून आला नाही. हे लक्षात येताच अधिराज च्या वडिलांनी विहिरीत उडी घेतली. अधिराजला विहिरीतून बाहेर काढले. व त्यास बारामतीतील शासकीय सिल्व्हर जुबिली रुग्णालयात नेले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जगताप यांनी अधिराज वर तातडीने उपचार सुरू केले. त्याच्या पोटातील पाणी काढून त्याची तपासणी केली. मात्र त्याचे शरीर कसलाच प्रतिसाद देत नव्हते. अखेर डॉक्टरांनी अधिराजला मृत घोषित केले. अधिराज च्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button