राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध दारु विरुध्द बारामती येथे संयुक्त कारवाई.
बारामतीत अवैद्य दारू धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध दारु विरुध्द बारामती येथे संयुक्त कारवाई.
बारामतीत अवैद्य दारू धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ६० हजार ५८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा गुन्ह्यांची नोंद केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील माळेगाव, घाडगेवाडी, पिंपळी व झारगडवाडी याठिकाणी सुरू असणाऱ्या अवैध दारू धंद्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने धडक मोहीम राबबवून एकूण सहा वारस गुन्हे व बेवारस गुन्ह्यांची नोंद केली. ही कारवाईत देशी-विदेशी दारूसह गावठी दारू व रसायन असा एकूण ६० हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. याप्रकरणी गणेश जाधव (३५ वय) मिनाक्षी काळे (वय २८) (दोघे रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रार्दभावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत अशा पद्धतीने वारंवार पोलीस विभागाला बरोबर घेऊन कारवाई करण्याचे संकेत निरीक्षक विजय मनाळे यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीही सतत अवैध ताडी धंदे, दारू निर्मिती केंद्रे, विक्री केंद्रे, अवैध ढाबे या ठिकाणी कारवाई करून गुन्हे नोंद केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी विशेष मोहिम राबवून उपअधीक्षक संजय जाधव, दौड विभागाचे निरीक्षक विजय मनाळे, भरारी पथक क्र. 2 पुणे निरीक्षक अनिल बिराजदार, जी विभागाचे निरीक्षक बाळासाहेब ढवळे व पोलीस उपअधीक्षक शिरगावकर यांच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली.