तुळजाराम चतुरचंदमहाविद्यालयात “CyberSafeBirthday” उपक्रमांतर्गत सायबर जागरूकतेचा जागरूक संगम
हेकार्ड्स पालक, नागरिक, विद्यार्थी आणि सहभागी

तुळजाराम चतुरचंदमहाविद्यालयात “CyberSafeBirthday” उपक्रमांतर्गत सायबर जागरूकतेचा जागरूक संगम
हेकार्ड्स पालक, नागरिक, विद्यार्थी आणि सहभागी
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आणि क्विक हिलफाउंडेशनच्या “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहरभाई वाघोलीकर यांच्या ८१व्या वाढदिवस व सहस्त्रचंद्रदर्शन समारंभाच्या निमित्ताने विविध सायबर व सामाजिक जनजागृती उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या विशेष दिवशी महाविद्यालयात सायबर सुरक्षेवर प्रबोधनात्मक पथनाट्य, तसेच जनजागृतीपर उपक्रमपार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थी,शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पथनाट्यातून OTP फसवणूक, फेक आयडी, सोशल मीडिया स्कॅम्स आणि असुरक्षित डिजिटलसवयी यावर विनोदी, पण विचारप्रवर्तक सादरीकरण करण्यात आले. हसवत-हसवत सायबर सुरक्षेचे गंभीर संदेश देणाऱ्या या प्रयोगाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमात एक विशेष वैशिष्ट्यम्हणजे “८१ सायबर तथ्ये” वर आधारित क्यू आर कोड्सचे प्रदर्शन करण्यात आले. या क्यूआर कोड्स स्कॅन करून प्रेक्षकांना सायबर सुरक्षेवरील विविध मुद्द्यांची माहिती मिळाली. प्रत्येक क्यू आर कोडमध्येएक खास सायबर तथ्य,त्याचे काय करावे आणिकाय करू नये, आणि उदाहरणासह विश्लेषण सादर करण्यात आले. तसेच, ८१ सायबर जागरूकता फॅक्ट्स असलेल्या विशेष ग्रीटिंग कार्ड्सचे वितरण करण्यात आले. हे कार्ड्स केवळ शुभेच्छा पत्र नव्हते, तर प्रत्येक कार्डमध्ये क्यू आर कोड माध्यमातून सायबर सुरक्षा संदेश आणि त्याद्वारे माहिती मिळवण्याची संधी होती. हेकार्ड्स पालक, नागरिक, विद्यार्थी आणि सहभागी शिक्षकांना भेट म्हणून देण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. अविनाश जगताप यांनी सायबर सुरक्षेच्या वाढत्या गरजेसंबंधी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सुरक्षिततेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थी सहभाग आणि सायबर जागरूकतेच्या अनोख्या सादरीकरणाबद्दल त्यांनी सर्व टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. अशोक काळगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ.योगिनी मुळे आणि डॉ.अरुण मगर, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा, डॉ. निरंजनशाह (वाणिज्य विभाग अधिष्ठाता) उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, कार्यसंघ सदस्य साक्षी लवंगारे, गायत्री केसकर आणि दिपू सिंगयांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात सर्व सायबर क्लबचे वॉरियर्स व बीबीए(सीए)विभागाचे विद्यार्थी यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रम सादरीकरण आणि व्यवस्थापनामध्ये विभागप्रमुख प्रा. सलमा शेख, प्रा.माधुरी सस्ते, प्रा. अश्विनी भोसले, प्रा. दत्तात्रय आराडे, प्रा. तृप्ती भोसले आणि प्रा. स्मिताकचरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने ‘Cyber Safe Birthday’ च्या माध्यमातून सायबर सुरक्षा, सामाजिक सहभाग आणि विद्यार्थ्यांचे नेतृत्व या सर्व बाबींचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.