तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवणे’ या एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग

तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवणे’ या एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग
बारामती वार्तापत्र
पर्यावरण विभागाच्या वतीने अकरावी आर्ट्स सायन्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा आनंद घेऊन पर्यावरण संवर्धन करावे. या उद्देशाने ‘पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवणे’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन २५ गणेश मूर्ती बनवल्या. विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण श्री. दीपक कुंभार, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची यांनी दिले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. गोरखनाथ मोरे समन्वयक श्री.संजय शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच पर्यावरण विभाग प्रमुख सौ.अनिता पाटील, तसेच श्री. पांडुरंग ओवेकर श्री.उदय कळंत्रे यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले.