तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.गौतम जाधव यांना विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक पुरस्कार जाहीर
एका आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.गौतम जाधव यांना विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक पुरस्कार जाहीर
एका आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.गौतम जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा 'सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक पुरस्कार' जाहीर झाला आहे.
१० फेब्रुवारी रोजी विद्यापीठात होणा-या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. डॉ.गौतम जाधव विद्यापीठाने सुरु केलेल्या या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले आहेत.
डॉ.गौतम जाधव शारीरिक शिक्षण संचालक म्हणून गेली १२ वर्षांपासून कार्यरत असून त्यांना पर्ल फाऊंडेशन मदुराई यांचे तर्फे 'सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक' पुरस्काराने गौरवांकित केले गेले होते.
आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये 'बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड' तसेच इन्स्टीटयूट ऑफ स्कॉलर्स बेंगलोर यांचेकडून 'रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड' देखील त्यांना मिळाला होता.
डॉ.गौतम जाधव यांनी महाविद्यालयातर्फे अनेक अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा, एका आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.
व्हॉलीबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेवल १ कोर्स देखील त्यांनी पूर्ण केला आहे. महाराष्ट्र राज्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचे विविध खेळांमध्ये मार्गदर्शक पद त्यांनी गेली अनेक वर्षे समर्थपणे व यशस्वीरित्या भूषविले आहे.
डॉ.गौतम जाधव यांनी हा बहूमोल पुरस्कार पटकावून संस्था व महाविद्यालयाच्या नावलौकिकात अतुलनीय भर घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्य जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलिंद शहा, संस्थेचे खजिनदार सुनील शहा लेंगरेकर, संस्थेचे अन्य विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांच्या या भरघोस यशाबद्दल डॉ.गौतम जाधव यांचे अभिनंदन केलेआहे.