तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांना प्राचार्या विजयाताई पाटील सेवाभाव गौरव पुरस्कार प्रदान
३१ वर्षांपासून इंग्रजी विभागामध्ये अध्यापनाचे कार्य त्या करीत आहेत.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांना प्राचार्या विजयाताई पाटील सेवाभाव गौरव पुरस्कार प्रदान
३१ वर्षांपासून इंग्रजी विभागामध्ये अध्यापनाचे कार्य त्या करीत आहेत.
बारामती वार्तापत्र
प्राचार्य हणमंतराव पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने सातारा येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांना प्राचार्या विजयाताई पाटील सेवाभाव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी गझलसंग्रह, काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.
सुरेश भट गझल गौरव पुरस्कार, कृष्णाई गझल गौरव पुरस्कार, चंद्रभागा तिरी गझल पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कवयित्री म्हणून त्यांची ख्याती आहे. मलेशिया, सिंगापूर, थायलंड या ठिकाणी अखिल भारतीय कवयित्री संमेलनातून निमंत्रित कवयित्री तसेच सूत्रसंचालक म्हणून कार्य केले आहे.
गेल्या ३१ वर्षांपासून इंग्रजी विभागामध्ये अध्यापनाचे कार्य त्या करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता मार्गदर्शन करीत आहेत.
प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांचे अभिनंदन केले आहे.