तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय सेवानिवृत्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा अठरावा आनंद मेळावा
दिवंगत सेवक, नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय सेवानिवृत्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा अठरावा आनंद मेळावा
दिवंगत सेवक, नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय सेवानिवृत्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा अठरावा आनंद मेळावा आनंदात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.धनसिंग जगताप होते.
याप्रसंगी दिवंगत सेवक, नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रा.एम.बी.कवठेकर, ज्ञानेश्वर लिंगे, बी.बी.कोरे, दत्तात्रय कुंभार यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ.धनसिंग जगताप, अरुण पंढरी यांचे वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रा.वर्धमान संगई यांना वयोमानाप्रमाणे ८८ वर्ष मेळाव्यास उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांचे घरी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी अमृता महेश बेलदार हिचे आयुर्वेद महाविद्यालयातील प्रवेशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.पगारे सर यांनी गीत गायन केले. त्याचप्रमाणे पगारे सर यांनी संस्था व पदाधिकारी यांचेबद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी विद्याधर महामुनी, शिवाजी पाटील, राजकुमार शहा यांनी सर्वांना भोजन दिले.प्रा.डॉ.सुरेश साळुंके यांनी प्रास्ताविक केले तर वसंत बेलदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.गोडसे यांनी आभार व्यक्त केले.