तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक समारंभ संपन्न
आपल्या आयुष्यात आई-वडीलांचे स्थान खूप मोठे

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक समारंभ संपन्न
आपल्या आयुष्यात आई-वडीलांचे स्थान खूप मोठे
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
श्रीशिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित सायली केरीपाळे, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, बालेवाडी, पुणे या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. तर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) होते. याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रवदन शहा (मुंबईकर), डॉ.जे.जे.शहा उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सायली केरीपाळे म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते सत्यात उतरविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि सराव केला पाहिजे, हे करीत असताना वास्तवाचे भान देखील ठेवले पाहिजे.
आपल्या आयुष्यात आई-वडीलांचे स्थान खूप मोठे आहे. कष्ट करणा-या आपल्या आई-वडिलांना विसरू नका. आज जे काही यश मी प्राप्त करू शकले ते माझ्या आई-वडीलांमुळेच असे त्या म्हणाल्या’.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाबरोबरच आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डॉ.अजिनाथ खरात, एनव्हारमेंटल अँड फिटनेस ग्रुप, बारामती यांनी बक्षिसाकरिता असे एकूण रक्कम रुपये ९४००० दिले.
क्रीडा विभागाबरोबरच सांस्कृतिक व एनसीसी विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांनाही या प्रसंगी पारितोषिके प्रदान करण्यात आली. शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.गौतम जाधव यांनी अहवाल वाचन केले. प्रा. अशोक देवकर यांनी क्रीडा पारितोषिकाचे वाचन केले.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले की, ‘आपण विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. ज्ञान, कौशल्य, अनुभव, मेहनत इ.च्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश मिळवावे. आपली संस्था कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी असतेच’.
संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ.मेघा बडवे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.गौतम जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्य, अधिष्ठाता, रजिस्ट्रार प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, बक्षीसदाते उपस्थित होते.