तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रा.विनायक लष्कर यांना विद्यापीठातर्फे ‘युवा गौरव पुरस्कार’ जाहीर
समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रा.विनायक लष्कर यांना विद्यापीठातर्फे ‘युवा गौरव पुरस्कार’ जाहीर
समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
बारामती वार्तापत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दिला जाणारा ‘युवा गौरव पुरस्कार’ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.विनायक लष्कर यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनी होणा-या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा.विनायक लष्कर हे या महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. १२ वर्षांपासून ते अध्यापनाचे काम करीत आहेत. ‘वडार समाज – समाजशास्त्रीय अभ्यास’ या पुस्तकास दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती मार्फत दिला जाणारा ‘२०१५ साहित्य पुरस्कार’ त्यांना दिला गेला. त्यांची समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतातील विमुक्त जाती-भटक्या जमातीचे प्रश्न, स्त्री-प्रश्न या विषयांवर त्यांनी लेखन केले असून विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय पातळीवरील चर्चासत्रे, परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
प्रा.विनायक लष्कर यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) , सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.