तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये “Night Sky Observation” आकाश निरीक्षण कार्यशाळा संपन्न.
३५० विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये “Night Sky Observation” आकाश निरीक्षण कार्यशाळा संपन्न
३५० विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास कक्ष अंतर्गत सोमवार दि.०२/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ११.३० या वेळेत विद्यार्थी व नागरिकांसाठी आकाशात होणाऱ्या बदलाची व खगोल शास्त्राची माहिती देण्यासाठी “आकाश निरीक्षण” या कार्यशाळेचे आयोजन भौतिकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी मार्गदर्शक श्री. तुषार पुरोहित, श्री. महारुद्र मटे व श्री. रुपेश लबादे, अंतर-विश्वविद्यालय केंद्र: खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी, (IUCAA), पुणे यांनी विद्यार्थ्यांना सायंकाळच्या आकाशातील ग्रहांचे दुर्बिणीतून मनोहारी दर्शन घडविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. राहुल (शेठ) वाघोलीकर, सदस्य, नियामक मंडळ, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती उपस्थित होते, त्यांनी १२ इंची दुर्बिणीचे उद्दघाटन केले. शनी ग्रहाची कडी, गुरु ग्रहावरचे पट्टे आणि त्याचे उपग्रह, तसेच चंद्र व चंद्रावरची विवरे इत्यादींचे निरीक्षण ४ शक्तिशाली दुर्बिणीतून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तारकासमूह, नेब्युला, नक्षत्र, राशी, ग्रह, तारे, चंद्र यांची अतिशय उत्साहात निरीक्षणे केली. या कार्यशाळेमध्ये ३५० विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मा. मिलिंद शाह वाघोलीकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हि कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी डॉ. राजेंद्र काळे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेची प्रस्तावना डॉ. रामचंद्र सपकाळ यांनी केली. प्रा. संदीप काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. विजय मोहिते यांनी काम पहिले.






