शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या इंडोनेशिया येथील ICANDIT 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेत सहा आंतरराष्ट्रीय आणि दोन सामंजस्य करार

शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या इंडोनेशिया येथील ICANDIT 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेत सहा आंतरराष्ट्रीय आणि दोन सामंजस्य करार

शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

बारामती वार्तापत्र 

कोठावळे यांनी इंडोनेशियातील सुकाबुमी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

 या परिषदे दरम्यान संस्थेने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सहा आंतरराष्ट्रीय आणि दोन राष्ट्रीय अशा एकूण आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक गतिशीलता संयुक्त संशोधन प्रकाशने, नवोपक्रम, कौशल्य विकास तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री जवाहर शाहा, सचिव श्री मिलिंद शाह,  यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमामुळे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे शैक्षणिक जाळे जागतिक स्तरावर अधिक मजबूत होणार असून संशोधन, नवनवीन उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या क्षेत्रात महाविद्यालयाची वाटचाल अधिक गतिमान होण्यासाठी मदत होणार आहे.

Back to top button