स्थानिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या डॉ.गौतम जाधव यांना सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक पुरस्कार तसेच प्रा.विनायक लष्कर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गौरव पुरस्कार प्रदान

भारतातील विमुक्त जाती-भटक्या जमातीचे प्रश्न, स्त्री-प्रश्न या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या डॉ.गौतम जाधव यांना सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक पुरस्कार तसेच प्रा.विनायक लष्कर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गौरव पुरस्कार प्रदान

भारतातील विमुक्त जाती-भटक्या जमातीचे प्रश्न, स्त्री-प्रश्न या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे.

बारामती वार्तापत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ.मोहन
आगाशे व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व अन्य मान्यवर यांचे हस्ते डॉ.गौतम जाधव यांना
सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक म्हणून व प्रा.विनायक लष्कर यांना सामाजिक कार्याकरिता 'युवा गौरव
पुरस्कार' स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र इ. प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. या दोन्ही पुरस्कारांनी
महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

प्रा.विनायक लष्कर हे या महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांची समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

१२ वर्षांपासून ते अध्यापनाचे काम करीत आहेत. वडार समाज समाजशास्त्रीय अभ्यास या पुस्तकास दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती मार्फत दिला जाणारा २०१५ साहित्य पुरस्कार त्यांना दिला गेला. भारतातील विमुक्त जाती-भटक्या जमातीचे प्रश्न, स्त्री-प्रश्न या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय पातळीवरील
चर्चासत्रे, परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

तर डॉ.गौतम जाधव शारीरिक शिक्षण संचालक म्हणून गेली १२ वर्षांपासून कार्यरत असून त्यांना पर्ल फाऊंडेशन मदुराई यांचे तर्फे 'सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक संचालक' पुरस्काराने गौरवांकित केले गेले होते.

आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये 'बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड' तसेच इन्स्टीटयूट ऑफ स्कॉलर्स बेंगलोर यांचेकडून
'रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड' देखील त्यांना मिळाला होता. डॉ.गौतम जाधव यांनी महाविद्यालयातर्फे अनेक अखिल
भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा, एका आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.

व्हॉलीबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेवल १ कोर्स देखील त्यांनी पूर्ण केला आहे. महाराष्ट्र राज्य तसेच सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ संघाचे विविध खेळांमध्ये मार्गदर्शक पद त्यांनी गेली अनेक वर्षे समर्थपणे व यशस्वीरित्या भूषविले
आहे.

डॉ.गौतम जाधव व प्रा.विनायक लष्कर यांना  मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा,
सचिव मिलिंद शहा, सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram