तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद सचिवपदी सौरभ पांढरे, तेजश्री लोणकर
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एच. व्ही. फाटक यांनी काम पाहिले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद सचिवपदी सौरभ पांढरे, तेजश्री लोणकर
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एच. व्ही. फाटक यांनी काम पाहिले.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद सचिवपदी सौरभ सुरेश पांढरे आणि तेजश्री गणेश लोणकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार ही निवडणूक पार पडली. विद्यार्थी परिषदेच्या उपस्थित सदस्यांमधून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून टीवायबीएस्सीचा विद्यार्थी सौरभ सुरेश पांढरे (टीवायबीएस्सी) याची विद्यार्थी परिषद सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली.
तर विद्यार्थिनी मधून विद्यार्थी परिषद सचिव म्हणून एम.एस्सी. केमिस्ट्रीच्या तेजश्री गणेश लोणकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मंगळवार दि. २९ मार्च 2022 ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक काळंगे या वेळी उपस्थित होते.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एच. व्ही. फाटक यांनी काम पाहिले.
सौरभ पांढरे, तेजश्री लोणकर यांची विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जवाहर शाह वाघोलीकर, सचिव श्री मिलिंद शाह वाघोलीकर, खजिनदार श्री सुनील शहा(लेंगरेकर), नियम मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेखर मुरूमकर, उपप्राचार्य डॉ. अविनाश जगताप, डॉ. अजित तेळवे, डॉ. जगदीश देशपांडे, डॉ. सीमा नाईग-गोसावी, डॉ. रामचंद्र सपकाळ, डॉ. योगिनी मुळे, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.