तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या सूरज जराडने इंद्रधनुष्य २०२४ स्पर्धेमध्ये मिळविला द्वितीय क्रमांक
महाराष्ट्रातील एकूण २७ विद्यापीठामधून हा क्रमांक प्राप्त
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या सूरज जराडने इंद्रधनुष्य २०२४ स्पर्धेमध्ये मिळविला द्वितीय क्रमांक
महाराष्ट्रातील एकूण २७ विद्यापीठामधून हा क्रमांक प्राप्त
बारामती वार्तापत्र
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठस्तरीय इंद्रधनुष्य २०२४ स्पर्धेत लोकवाद्य वृंद कलाप्रकारात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी सूरज जराडने एकूण १० वाद्य वाजवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास द्वितीय क्रमांक प्राप्त करून दिला.
महाराष्ट्रातील एकूण २७ विद्यापीठामधून हा क्रमांक प्राप्त झाला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत महाविद्यालयास विजेतेपद मिळाले होते.
व संगमनेर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत देखील सूरज व महाविद्यालयीन सांस्कृतिक समुहाने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
सूरज या उत्कृष्ट किर्तनकार देखील आहे. सूरज जराडने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भीमराव तोरणे यांनी अभिनंदन केले आहे.