‘तु आमच्या शेतातून रस्ता कसा काढतो, हे पाहतोच’ म्हणत रस्त्याचे काम करण्यासाठी गेलेल्या शासकीय ठेकेदाराला बारामतीतील वकिलाने केली बेदम मारहाण?
मशिनरी जाळून टाकण्याची धमकी देणार्या दोघांवर गुन्हा दाखल.

‘तु आमच्या शेतातून रस्ता कसा काढतो, हे पाहतोच’ म्हणत रस्त्याचे काम करण्यासाठी गेलेल्या शासकीय ठेकेदाराला बारामतीतील वकिलाने केली बेदम मारहाण?
मशिनरी जाळून टाकण्याची धमकी देणार्या दोघांवर गुन्हा दाखल.
बारामती वार्तापत्र
शासकीय रस्त्याचे काम करण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराला ‘तु आमच्या शेतातून रस्ता कसा काढतो, हे पाहतोच’ असे म्हणत बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी वकिलासह दोघांवर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 24 वर्षीय शासकीय ठेकेदाराने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अॅड. सारथी दिनेश पानसरे आणि मयुर विकास पानसरे (दोघे रा. शिर्सुफळ, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शिर्सुफळ येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 2021 पासून सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत. बांधकाम विभाग, बारामती यांच्याकडून त्यांना शिर्सुफळ गोजुबावी रोडचे काम सोपविण्यात आले होते. ते आपल्या सहकाऱ्यांसह 25 ऑगस्ट रोजी काम सुरू करत असताना दुपारी 12 वाजता आरोपी घटनास्थळी आले. त्यांनी रोडचे काम कोण करत आहे, असे विचारून फिर्यादीकडे गेल्यानंतर त्यांना मारहाण सुरू केली.
अॅड. सारथी पानसरे यांनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच, “तु येथे आमच्या शेतातून रस्ता काढतोस, तुला आणि तुझ्या मशिनींना जाळून टाकीन,” अशी धमकी दिली. त्यांना दाखविलेल्या कागदपत्रांचा अपमान करून पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनाही अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
मयुर पानसरे यांनीदेखील “तु इथे काम कसा करतोस ते पाहतोच,” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादीच्या कानातील हिर्याचा खडा पडून गहाळ झाला. तेथील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. यानंतर ठेकेदाराने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार वाघ करत आहेत.