स्थानिक

तु.च. महाविद्यालयाच्या गणेश दडसची विद्यापीठस्थरीय रा.से.यो.( प्रशंसा प्रमाणपत्रासाठी) पुरस्कारासाठी निवड

या सर्वोत्कृष्ट प्रस्तावांची शिफारस राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येते.

तु.च. महाविद्यालयाच्या गणेश दडसची विद्यापीठस्थरीय रा.से.यो.( प्रशंसा प्रमाणपत्रासाठी) पुरस्कारासाठी निवड

या सर्वोत्कृष्ट प्रस्तावांची शिफारस राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येते.

बारामती वार्तापत्र 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश नंदकुमार दडस याची राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक प्रशंसा प्रमाणपत्रासाठी निवड झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांना उत्कृष्ट महाविद्यालय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी उत्कृष्ट स्वयंसेवक असे पुरस्कार विद्यापीठ व जिल्हास्तरावर दिले जातात. या सर्वोत्कृष्ट प्रस्तावांची शिफारस राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येते. सन 2019-20 शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजना संलग्नीत महाविद्यालय मार्फत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्राप्त झालेल्या प्रस्तावातून राष्ट्रीय सेवा योजनेमधील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रस्तावाची शिफारस महाराष्ट्र शासनास राज्यस्तरीय पुरस्कार करिता करण्यात आलेली होती. याच प्रस्तावामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक गणेश दडस यांची निवड करण्यात आलेली आहे.

त्याने यापूर्वी विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर, विद्यापीठस्तरीय पूरग्रस्त आपत्ती निवारण शिबिर, व्यसनमुक्ती, रोड सुरक्षा, वायुप्रदूषण, स्वच्छता आणि निरोगी आरोग्य, मतदान जागृती अशा महाविद्यालय, विद्यापीठ तसेच राज्य पातळीवरील शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याच्या या सक्रीय सहभागाची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलिंद शहा वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास कर्डिले यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button