
तृप्ती वीरकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार
१६ सरपंच व इतर सामाजिक संस्थांना उत्कृष्ट कार्याबदल
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सावळ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ तृप्ती जितेंद्र वीरकर यांना रविवार दि.१० ऑगस्ट रोजी पुणे येथे आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट, पुणे या संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित,आदर्श सरपंच गौरव पुरस्कार व प्रकाशवाट सामाजिक गौरव पुरस्कार कार्यक्रम वेळी सदर पुरस्कार देण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणारे १६ सरपंच व इतर सामाजिक संस्थांना उत्कृष्ट कार्याबदल सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी केंद्रीय वस्तु एवं सेवाकर लेखा परिक्षा चे आयुक्त देवेंद्र नागवेंकर , अप्पर आयुक्त केंद्रीय बस्तु एवं सेवाकर लेखा परिक्षा च्या वैशाली पतंगे, केंद्रीय पातु एवं संवाद परिक्षा चे अधीक्षक अतुल यादव,अपर आयुक्त केंद्रीय वस्तु एवं सेवाकरले परिक्षय चे मोसुगंटी गंगाधर, प्रेम कुमार कार्यकारी सहायक आणि अध्यक्ष प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट
अॅड. श्री. इंद्रजित डोंगरे , वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वनवे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वीरकर व सावळ मधील ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्तीत होते.
सावळ ग्रामपंचायत विकासात अग्रेसर ठेवणे ,शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे व रस्ता, वीज,पाणी, शिक्षण व आरोग्य ग्रामस्थांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून देत असताना सामाजिक बांधिलकी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तृप्ती वीरकर यांनी आदर्श सरपंच पुरस्कार घेतल्यानंतर सत्काराला उत्तर देताना सांगितले.