तेल साठवणारे सूक्ष्मजीव : जैवतंत्रज्ञानातील नवी दिशा
जैवतंत्रज्ञान विभाग, च्या वतीने नवे संशोधन

तेल साठवणारे सूक्ष्मजीव : जैवतंत्रज्ञानातील नवी दिशा
जैवतंत्रज्ञान विभाग, च्या वतीने नवे संशोधन
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागात तेल साठवणारे सूक्ष्मजीव (Oleaginous Microbes) या नव्या विषयावर अंतिम टप्प्यात संशोधन सुरू असून या सूक्ष्मजीवांचा वापर करून भविष्यात जैवइंधन, आरोग्यपूरक पदार्थ आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण साधने उपलब्ध होऊ शकतात.
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान विभाग, तृतीय वर्षाची जैवतंत्रज्ञानाची विद्यार्थिनी कु. नेहा कोळेकर ह्या ओलिअजिनस सूक्ष्मजंतू या विषयावर डॉ. राजेश शर्मा, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहेत.
तेल साठवणाऱ्या सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य यीस्ट, बुरशी, जीवाणू आणि सूक्ष्म-शैवाल यांसारखे काही सूक्ष्मजीव त्यांच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठवू शकतात. अनुकूल परिस्थितीत हे सूक्ष्मजीव कोरड्या वजनाच्या ७०% पेक्षा जास्त तेल तयार करतात. या विशेषतेमुळे त्यांना “ओलिअजिनस सूक्ष्मजीव” असे संबोधले जाते.
जीवक्रियावरील टप्पे
संशोधनानुसार सूक्ष्मजीवांचे जीवनचक्र तीन महत्त्वाच्या टप्प्यांत विभागलेले आहे:
वाढ टप्पा (Growth Phase): पोषक तत्वांनी समृद्ध वातावरणात सूक्ष्मजीवांची वाढ होते.
तेल साठवण टप्पा (Oil Accumulation Phase): पोषक द्रव्यांची कमतरता भासल्यास हे सूक्ष्मजीव ऊर्जा साठवण्यासाठी तेल तयार करतात.
रासायनिक मार्ग (Chemical Pathways): आधुनिक जनुकीय अभियांत्रिकीच्या साहाय्याने या सूक्ष्मजीवांच्या तेल निर्मितीची कार्यक्षमता वाढवली जाते.
मायक्रोबियल तेलाचे महत्त्व
मायक्रोबियल तेलांमध्ये ओमेगा-३ व इतर आवश्यक फॅटी अॅसिडस् मुबलक प्रमाणात आढळतात. यांचा वापर मानवी पोषण, औषधनिर्मिती, जैवइंधन निर्मिती आणि विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये करता येतो. परंपरागत वनस्पती तेलांवर ताण कमी करून टिकाऊ पर्याय उपलब्ध करून देण्याची क्षमता या सूक्ष्मजीव तेलांमध्ये आहे.
मानवी जीवनासाठी संभाव्य उपयोग
मानवी पोषण: डीएचए (DHA) आणि ईपीए (EPA) सारख्या फॅटी अॅसिडस् अन्नपूरकांमध्ये वापरले जातात.शेती व प्राणी आहार या साठी सूक्ष्मजीवांपासून तयार होणारे तेल शेती आणि मत्स्यपालनात उपयुक्त ठरते. व औद्योगिक स्तरावर हे सूक्ष्मजीव जैवडिझेल निर्मितीसाठी पर्याय ठरू शकतात.
चौकट :
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात सुरू असलेले हे संशोधन जैवइंधनासह पोषणपूरक उत्पादनांच्या विकासासाठी एक पाऊल ठरू शकते. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग होण्याची शक्यता असून मानवी जीवन व शेती साठी महत्वपूर्ण योगदान असणार आहे:
डॉ. राजेश शर्मा जैवतंत्रज्ञान विभाग
चौकट:
तेल साठवणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून संशोधन करत असताना येणाऱ्या काळात सर्वांसाठी उपयुक्त व वरदान ठरेल असा एक टप्पा येईल : जैवतंत्रज्ञानाची विद्यार्थिनी कु. नेहा कोळेकर