महाराष्ट्र

तेव्हा देशाचे कृषिमंत्री कोण होते?; विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा,

Radhakrishna Vikhe कृषी विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आपला जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुने दाखले देत जोरदार निशाणा साधला आहे.

तेव्हा देशाचे कृषिमंत्री कोण होते?; विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा,

Radhakrishna Vikhe कृषी विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आपला जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुने दाखले देत जोरदार निशाणा साधला आहे.

नगर:बारामती वार्तापत्र

‘तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना या देशात कृषी क्षेत्रासाठी ‘मॉडेल अॅक्ट’ आणला गेला. राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वायदे बाजार, ऑनलाइन ट्रेडिंग आणि खासगी बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी दिली. त्यावेळी देशाचे कृषिमंत्री कोण होते, हे सर्वांनाच माहिती आहे,’ असे सांगत माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित एका कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणाचे कौतुक करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली.

विखे पाटील म्हणाले, ‘नव्या कृषी धोरणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट आणला, पण आता या नेत्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडला आहे.

केंद्रात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच या देशात मॉडेल अॅक्ट आणला गेला. त्यावेळी कृषिमंत्री कोण होते, हे सर्वांनाच माहिती आहे. राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वायदे बाजार, ऑनलाइन ट्रेडिंग आणि खासगी बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी दिली.

मात्र, याचा सोयीस्कर विसर आता काँगेस नेत्यांना कसा पडलाॽ विधेयकाला विरोध करताना सभागृहात कोणाची भूमिका काय होती, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकप्रकारे विधेयकाला पाठिंबा देत काँग्रेसला तोंडावर पाडले आहे,’ अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन कृषी धोरणाचे स्वागत करुन विखे पाटील म्हणाले, ‘या धोरणांमुळे कृषी व्यवसायाला स्वातंत्र्य मिळाले आहे.

मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टींचा समावेश या धोरणात असल्याने कृषी व्यवसायात अमूलाग्र बदलांच्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. देशातील विरोधक केवळ आपल्या अस्तित्वासाठी या विधेयकाचे राजकारण करीत आहेत. नव्या कृषी धोरणात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहाणार असून या मध्यमातून स्पर्धा निर्माण होईल.

योग्य भाव आणि पारदर्शक कारभारातून शेतकऱ्यांना आकर्षित करणारी व्यवस्था निर्माण केली जाईल.’राज्य सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ‘करोना संकटाच्या काळात राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला.

मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्याला कोणतीही मदत केली नाही. उत्पादित माल फेकून द्यावा लागला. शासनाने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. परंतु निर्णय करणारेच घरात बसले. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जेवढी तत्परता दाखवली तेवढी शेतकऱ्यांसाठी का दाखवली नाही? बाजार समित्या बंद ठेवणारेच आज शेतकऱ्यांच्या खोट्या प्रेमाचा पुळका दाखवित आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram