त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा ‘ड्रायव्हर ‘कोरोना पॉझिटिव्ह.
63 पैकी 52 निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह तर 10 अहवाल प्रतीक्षेत
आज 22 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह.
त्या दहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत
बारामती :वार्तापत्र तो 22 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे .
बारामतीतील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ६३ जणांपैकी ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल वसतिगृह परिसरात वास्तव्यास असलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी दहाजणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली.बारामती शहरात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन कामाला लागले असून पुढील धोका टाळण्याच्या उद्देशाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने काल ६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील २२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.अद्याप दहाजणांचे तपासणी अहवाल वेटींगवर आहेत. एकूणच ५२ जणां काळजी घ्या कोरोना टाळा असेंआव्हान प्रशासन करत आहे