स्थानिक

त्या श्वानाने रोखला अर्धा तास विषारी नागाचा रस्ता

कुटुंबातील व्यक्तींना तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सर्प मित्रांना संपर्क साधण्यास सुरुवात केली .

त्या श्वानाने रोखला अर्धा तास विषारी नागाचा रस्ता

सोमेश्वरनगर:बारामती वार्तापत्र

कुत्र्यासारखा  इमानदार कोणताही पाळीव प्राणी नाही  या म्हणीची प्रचिती सोमेश्वरनगर  येथील एका कुटुंबाला आली.डॉलर नावाच्या लॅब्रेडॉर जातीच्या या श्वानाने सर्पमित्र येईपर्यंत  तब्बल अर्धा तास  विषारी नागाचा रस्ता रोखून धरला व  त्याला   टीचभर हलुनही दिले नाही  .

सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील धुमाळ कुटुंबीय नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते संध्याकाळचे साधारणता ७ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव श्वान डॉलरला  कुटुंबातील एका सदस्याने सोडून दिले त्यानंतर साधारणत सव्वा सातच्या दरम्यान डॉलर जोरजोरात भुंकू लागला नेहमीपेक्षा तो अधिक तीव्र  भुंकत  होता म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने पाहिले असता घराच्या पाठीमागील बाजूस एका विषारी नागा ला कुत्रा घरात  जाण्यास अटकाव करत होता. त्यांच्या जोरजोरात   भुंकण्याने घर परिसर डोक्यावर घेतला

कुटुंबातील व्यक्तींना तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सर्प मित्रांना संपर्क साधण्यास सुरुवात केली .आठ फाटा येथील सर्पमित्र   मिलिंद कांबळे येईपर्यंत तब्बल अर्धा तास डॉलर या श्वानाने  विषारी नागाला टिचभर घालून दिले नाही

सर्पमित्र येताच त्यांना मोठ्या शिताफीने या विषारी नागाला  पकडले व सुरक्षितरित्या वनविभागात सोडून दिला.

Related Articles

Back to top button