थकीत वीज बिल ग्राहकांसाठी,महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना;नितीन राऊत यांनी महत्त्वाची घोषणा
या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे.
थकीत वीज बिल ग्राहकांसाठी,महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना;नितीन राऊत यांनी महत्त्वाची घोषणा
या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे.
प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात आलेले भरमसाठ बिल अजूनही लोक फेडत आहे. अशातच राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री यांनी आज मंगळवारी 1 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे भरले तरच महावितरणला सध्याचा कोळसा टंचाईतून मार्ग काढता येईल अन्यथा भारनियमनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे वीज ग्राहकांनी नियमित वीज बिल भरावे असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये?
योजनेचा कालावधी १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत राहील, ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. थकबाकीदार ग्राहकांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व विलंब आकार १००% माफ होईल. मूळ थकबाकीत सवलत देण्यात येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरणा केल्यास उच्चदाब ग्राहकांना ५% व लघुदाब ग्राहकांना १०% अधिकची सवलत थकीत मुद्दल रकमेत मिळेल.
सुलभ हप्त्यात बिल भरण्याची सोय –
जर ग्राहकांना रक्कम सुलभ हप्त्याने भरावयाची असल्यास मुद्दलाच्या ३०% रक्कम एकरकमी भरणे, अत्यावश्यक आहे व यानंतरच त्यांना उर्वरीत रक्कम ६ हप्त्यात भरता येईल. ज्या ग्राहकाला हप्त्याने थकीत रक्कम भरावयाची असल्यास वीज कनेक्शन चालू केल्यावर चालू बिलाच्या रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य असेल. जर लाभार्थी ग्राहकाने उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली नाही तर पुन्हा माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होईल.