थॅलेसिमिया दिनानिमित्त वसंतनगर येथे महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

थॅलेसिमिया दिनानिमित्त वसंतनगर येथे महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

बारामती वार्तापत्र 

थॅलेसिमिया हा एक असा आजार आहे जो लहान मुलांना जन्मताच झालेला असतो. त्याची लक्षणे तीन महिन्यात दिसून येतात. रक्त उपलब्ध झाले नाही तर लहान मुलांचे जीवन धोक्यात येते.

या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने वसंत नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सुनेत्रा वहिनी पवार (अध्यक्षा- टेक्स्टाईल पार्क बारामती), ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा गुजर, श्री इमतियाज शीकीलकर (अध्यक्ष बारामती शहर रा. काँ), महिला अध्यक्षा अनिता ताई गायकवाड, मा नगरसेवक सविता जाधव, अर्चना जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजय जाधव, अविनाश गायकवाड, सयाजी गायकवाड व तेनूर शेख तसेच वसन नगर मधील नागरिक युवक व महिला ने प्रचंड संख्येने हजर होत्या.


सदर प्रसंगी महिलांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. रक्तदात्यांची सुनेत्रा वहिनीनी आपुलकीने विचारपूस केली. या शिबिरामध्ये उद्दिष्ट पेक्षा जास्त रक्त बाटल्यांचे संकलन झाले.

महेश गायकवाड यांच्यावर विश्वास असणाऱ्या युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. किरण दादा गुजर यांनी कोंडीबा गायकवाड या कुटुंबांचे वसंत नगरच्या जडण घडणीमध्ये मोलाचे योगदान आहे. याचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button